वाडा परिसरातील नागरिकांची अग्निशामक दलाची मागणी

वाडा: वाडा येथे खंडेश्वरी नाका येथे काळ दुचाकी स्पेअर पार्टस दुकान जळून खाक ,लाखो रुपयांचे नुकसान झाले.
काळ दि.4 ऑक्टोबर 2019 रात्री 9.00 वाजण्याच्या सुमारास खंडेश्वरी नाका येथील टू व्हीलर ऑटो पार्टस या दुकानाला आग लागली प्राथमिक माहिती नुसार ही आग शॉर्ट सर्किट मुले झाली असेल असा अंदाज दुकान मालक सागर आंबवणे यांनी सांगितले.
फायर जवळपास अग्निशमन केंद्र नसल्यामुळे स्थानिक तरुण वर्गाने टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न निष्फळ ठरले त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासून असलेली अग्नी शामक केन्द्र ही मागणी पुढे आली आहे कारण वाडा हे तालुकाच्या ठिकाण व नगरपरिषद असून सुद्धा प्रशासन च्या ढिसाळ कारभार आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने अग्निशमन केंद्राची गरज असताना सुद्धा ती पूर्ण होऊ शकत नाही अशी नागरिकांच्या मनात भावना निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वाडा भिवंडी महामार्ग मृत्यूचा सापळा

अंबाडी: वाडा-भिवंडी महामार्गावरील दुगाड फाटा या ठिकाणी 9 ऑक्टोबर च्या रात्री 10.45 च्या सुमारास ऍक्टिवा गाडीचा HR पासिंग असलेल्या ट्रक खाली चीरडून एका मूलीचा मृत्यु. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी कुडूस येथील असून तिचे नाव डॉ. नेहा शेख आपल्या लग्नाच्या खरेदीसाठी भावाला घेऊन भिवंडी या ठिकाणी खरेदीसाठी गेली होती,आणि तीच्या […]