वाडा भिवंडी महामार्ग मृत्यूचा सापळा

अंबाडी: वाडा-भिवंडी महामार्गावरील दुगाड फाटा या ठिकाणी 9 ऑक्टोबर च्या रात्री 10.45 च्या सुमारास ऍक्टिवा गाडीचा HR पासिंग असलेल्या ट्रक खाली चीरडून एका मूलीचा मृत्यु.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी कुडूस येथील असून तिचे नाव डॉ. नेहा शेख आपल्या लग्नाच्या खरेदीसाठी भावाला घेऊन भिवंडी या ठिकाणी खरेदीसाठी गेली होती,आणि तीच्या लग्नाची तारीख जवळ येऊन ठेपली असता सुप्रीम कंपनीच्या गलथान कारभार मुले निरपराध मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे.
ह्या घटनेमुळे स्थानिक युवकांनी ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत सुप्रीम कंपणीचा टोल नाका बंद केला आहे, तसेच ह्या घटनेमुळे नागरिकांच्या मनात एकाच प्रश्न येतोय की हे सरकार आणि सुप्रीम कंपनी सामान्य नागरिकांनाचे किती बळी घेणार ह्या घटनेचा येणाऱ्या मतदानावर नक्कीच परिणाम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघात महायुतीला बालेकिल्ला कायम ठेवण्याचे आव्हान

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात आता पर्यंत चारवेळा भाजपचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि मागील निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार शांताराम मोरे विजयी झाले आहेत,या मतदारसंघात युतीचे वर्चस्व राहिले आहे व ते कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. सोमवार दिनांक 7ऑक्टोबर 3.00 वाजेपर्यंत निवडणूक अर्ज मागे घेण्याची वेळ होती, ती संपल्या […]