भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघात महायुतीला बालेकिल्ला कायम ठेवण्याचे आव्हान

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात आता पर्यंत चारवेळा भाजपचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि मागील निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार शांताराम मोरे विजयी झाले आहेत,या मतदारसंघात युतीचे वर्चस्व राहिले आहे व ते कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.
सोमवार दिनांक 7ऑक्टोबर 3.00 वाजेपर्यंत निवडणूक अर्ज मागे घेण्याची वेळ होती, ती संपल्या नंतर भिवंडी ग्रामीण मधील मुख्य लढत कोण कोणत्या उमेदवार मध्ये होणार आहे यांची उत्सुकता सर्वांनी लागली होती.ही लढत प्रामुख्याने विद्यमान आमदार श्री शांताराम मोरे (शिवसेना),सौ. माधुरी शिशिकांत म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),कु.शुभांगी गोवारी(मनसे) व श्री.स्वप्नील महादेव कोळी (बहुजन वंचित आघाडी) या चार उमेदवार मध्ये ही मुख्य लढत होणार आहे.
राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना च्या शांताराम मोरे यांनी 57 हजार 082 एवढी मते घेत विजय मिळवला. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर भाजप चे शांताराम पाटील होते. त्यांना 47 हजार 922 मते मिळाली. आणि त्यांचा 9 हजार 160 मतांनी पराभव झाला. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर मनसे चे दशरथ पाटील, चौथ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस चे महादेव घाताळ आणि पाचव्या क्रमांकावर काँग्रेस चे सचिन शिंगडा होते.
मागील पंचवार्षिक निवडणूकीचे निकाल पाहिले तर त्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते त्या मुळे ही निवडणुक मागील निवडणुकी पेक्ष्या निश्चित वेगळी आहे,कारण या निवडणुकी मध्ये महायुती आणि महाअघाडी आहे, असे असल्यामुळे या निवडणूकीत युतीला हा गड आपल्याकडे ठेवण्यात फारशे जड जाणार नाही असे चित्र या मतदार संघ मध्ये आहे.
भिवंडी ग्रामीण हा मतदारसंघ भिवंडी आणि वाडा दोन तालुक्यातील ग्रामीण भागात विभागला आहे, मतदारसंघात मध्ये अनेक समस्या आहेत प्रामुख्याने टोरंट पावर चे वीजदर,ग्रामीण रस्ते,रुग्णालय यांची बिकट अवस्था.
या निवडणुकित महत्वाचा विषय आहे तो वाडा-भिवंडी यांना जोडणारा महामार्ग आणी त्याचे निष्कृष्ट काम या खराब दर्जाच्या कामामुळे आज पर्यंत अनेक निरपराध लोकांचे जीव गेले आहेत , त्यामुळे विद्यमान आमदार बद्दल या मतदारसंघात नाराजीचे वातावरण आहे,त्यामुळे हे मुद्दे त्यांना निवडणूकित त्यांना जड जाणार आहेत हे मात्र निश्चित आहे.
यावेळी या मतदारसंघातुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवखी महिला उच्च शिक्षित व तरुनी उमेदवार दिला आहे.या मतदारसंघात मनसे कडे कोणता मोठा नेता नसला तरी विद्यमान आमदारांवर असलेली नाराजी , उच्च शिक्षित महिला उमेदवार आणि भिवंडी येथे मा.श्री राज साहेब ठाकरे यांची झालेली सभा व त्याचे मतदाना मध्ये किती रूपांतर होते ही मनसे साठी जमेची बाजू आहेत.
या मतदारसंघातुन राष्ट्रवादी कॉन्ग्रेस पार्टीने शिशिकांत म्हात्रे यांच्या पत्नी माधुरी म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे
माधुरी म्हात्रे या भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत,त्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासकामे या विभागात केली आहेत ,ही कामे घेऊन त्या या निवडनूकीला सामोऱ्या जाणार आहेत आणि महाअघाडी असल्यामुळे त्यांना नक्कीच याचा फायदा होइल .
वंचित बहुजन अघाडी यांनी सुद्धा या मतदारसंघात उमेदवार दिला आहे पण त्यांची पक्ष संघटनात्मक बांधणी मतदारसंघात नसल्यामुळे त्यांचा मतदांरावर एवढा प्रभाव पडणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मतदाराना गृहित धरणे पडले महागात

मागील निवडणूकीपेक्षा ही निवडणूक नक्कीच वेगळी होती कारण या निवडणुकीत मतद्रनू त्यांचा प्रगळभ पण राजकारणी लोकांना दाखवून दिला आहे निवडणूकीतून मतदार राजाने सत्ताधारी नेत्याने त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी मतदाराना गृहीत धरून चालले होते आणि बोलत होते आम्ही पुन्हा येणार-पुन्हा येणार याला मतदार राजाने चांगलीच […]