मतदाराना गृहित धरणे पडले महागात

मागील निवडणूकीपेक्षा ही निवडणूक नक्कीच वेगळी होती कारण या निवडणुकीत मतद्रनू त्यांचा प्रगळभ पण राजकारणी लोकांना दाखवून दिला आहे
निवडणूकीतून मतदार राजाने सत्ताधारी नेत्याने त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी मतदाराना गृहीत धरून चालले होते आणि बोलत होते आम्ही पुन्हा येणार-पुन्हा येणार याला मतदार राजाने चांगलीच चपराक मारली आहे, त्यांनी या वेळी दाखवून दिले आहे की मतदार हाच खरा या लोकशाहीत राजा आहे,आणि लोकशाही जिवंत ठेवण्यात त्यांचे योगदान मतदान रुपी आवश्यक आहे ते या निवडणुकीत दाखवून देण्यात यश आले आहे असं एकंदरीत चित्र सध्या तरी दिसते.
परंतु निवडणुक निमीत्ताने काळजी करण्यासारखी परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे ती म्हणजे मतदानाचे घटकेलले मताधिक्य कारण पन्नास टक्क्यां पर्यत मतदानाची टक्केवारी येऊन पोहचली आहे ही लोकशाही जीवंत ठेवण्यात चिंतेची गोष्ट आहे कारण ही टक्केवारी अशीच कमी होत राहली तर लोकशाही धोक्यात येईल आणि अराजकता माजेल, या सर्व परिस्थितीवर राजकारणी लोकांनी चिंतन करण्याची वेळ आहे.
कारण लोकांची मानसिकता बद्दल करण्याची गरज आहे, ग्रामीण भागात अजून सोयी सुविधांचा अभाव या मुळे अनेक ठिकाणी मतदानावर बहिष्कार या सारखे प्रकार घडत आहेत, शहरातील नोकरदार वर्ग ही मिळालेल्या सुट्टीचा उपयोग शॉपिंग करण्यात घालवत आहे, त्यांच्या मनात एकाच भावना निर्माण आहे ती म्हणजे सगळे राजकारणी सारखे कोणीही आले तरी सामान्य माणसाचा विकास होणार नाही.
या निवडणुकीचे आकर्षण म्हणजे प्रथमच निवडणुकीत उतरलेले नविन चेहरे, भारत हा तरुणांचा देश आपण नेहमी म्हणत असतो की तरुण हीच आपल्या देशाची खरी संपत्ती आहे, सुशिक्षित तरूणाई राजकारणात यायला हवे तरच आपल्या देश वेगळ्या दिशेनं आगेकूच करील, या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्ती ने आदित्य ठाकरे यांच्या रूपाने पहिली निवडणूक वरळी मतदारसंघात लढवली आणि भरघोस मताने निवडून सुद्धा आले.शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र चा भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट सुद्धा केलं होतं.
तसेच या निवडणुकीत पवार घराण्यातील राजेंद्र पवार यांचे सुपुत्र रोहित पवार या निवडणूकीत आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले कारण त्यांनी कर्जत-जाम खेड मतदार संघात मंत्री राम शिंदे सारख्या बलाढ्य उमेद्वाराच्या विरोधात निवडणूक लढवली आणि भरघोस मताने निवडून सुद्धा आले महत्वाचे म्हणजे हा पवारांचा बालेकिल्ला नसताना सुद्धा त्यांनी हा मतदारसंघ निवडला आणि निवडणुकीच्या आधीपासून त्यांनी या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली होती त्यानी या मतदारसंघात उणीवा शोधून लोकांसमोर मांडल्या, आणि एक युवा राजकारणी म्हणून लोकांनी त्याला प्रतिसाद सुद्धा दिला.
या निवडणुकीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती कोण कोणत्या पक्षात आहे कळेना झाले होते कारण मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षात पक्षांतर झाले. त्यामुळे विरोधीपक्ष जीवंत राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि सत्ताधारी मोठ्या अर्विभावणे सांगत होतेट अब की बार 250 पार पण हे त्त्यांचं स्वप्नंच राहील, परंतु त्यांना मागील वेळेला मिळाल्या जागा ही राखता आल्या नाही, पंकजा मुंडे, राम शिंदे, रोहिणी खडसे या मंत्री पराभुत झाले सत्ताधाऱ्यांना आत्मचितंनाची गरज आहे कारण जनतेला काय हवंय त्यांनी समजून घ्यावे तरच जनता तुमच्या पाठीशी उभी राहील.
विरोधी पक्षात आलेली मरगळ या निवडणुकीच्या निमित्ताने झटकली गेली आणि त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला कारण सत्ताधारी पक्ष्याने जे आकडे दिले होते त्यामुळे वाटत होते की विरोधी पक्ष सपंला.
शरद पवारा सारख्या 80 वर्षे मुरब्बी राजकारण्यानं जो झंजावाती प्रचार महाराष्ट्र भर केला आणि ज्या प्रकारे सभा घेतल्या आणि तरुणवर्ग आपल्या कडे आकर्षित घेतले आणि त्यांचा फायदा त्यानां झाला आणि अपेक्षा पेक्ष्या जास्त जागा राष्ट्रवादीवादी काँग्रेस पक्षाला राखता आल्या, त्यांचा फायदा काँग्रेस पक्षाला सुद्धा झाला त्यांचा कोणताही मोठा नेता प्रचारात नव्हता तरी त्याच्या राज्यातील नेत्यांनी आपल्या परिसरातील जागा नेटाने लढवल्या आणि त्या राखल्या.
या निवडणुकीत महत्वाची बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीवादी काँग्रेस चा बालेकिल्ला या सातारा मतदारसंघात छत्रपती उद्ययन राजे महाराज यांनी अवघ्या चार महिण्यात निवडणुक जिकुंन सुद्धा सत्ताधारी पक्षात घेतलेली कोलांटउडी लोकानां पसत पडली नाही, त्यानं मतदार राजाने त्यांची नाराजी दाखवून दिली. भाजप आणि शिवसेना याना असे वाटत होतं की आपलीच सत्ता बहुमताने येणार आणि मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा यासाठी शेवट पर्यत त्यांच्यात संघर्ष चालू होता
निवडणूक आचारसंहीते पर्यत त्यांचे जागा वाटप निश्चित झालं नव्हतं दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने प्रचार करत होता, शिवसेना-भाजप यांनी एकमेकांसमोर 46 जागांवर बंडखोर उभे केले होते , आणि निष्ठावंताना तिकिट नाकारल्याने अनेक ठिकाणी बंडखोरी झाली या सर्वांचा फटका त्यांना बसला त्यामुळे त्यांच्या जागा मागील निवडणुकी पेक्षा कमी झाल्या.
हे सर्व झाल असलं तरी जनतेने महायुतीला सत्ता स्थापन होईल एवढ्या जागा दिल्या आणि विरोधक ही जिवंत ठेवले त्यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना बहुमताचे सरकार येणार हे स्वप्न हवेत विरले आणि सामान्य जनतेला गृहित धरू नका अशी चपराक दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

उत्तम आहार हीच यशाची गुरूकिल्ली

आरोग्यम् धनसंपदा : उत्तम आहार यांची गरज आजच्या युवा पिढीला आहे असं वाटत कारण आजचा तरुण महत्वाकांक्षी जीवन जगत असताना आपल्या योग्य आहाराकडे विशेष वेळ देण्याची गरज आहे. कारण आपला आहार योग्य नसेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर नक्कीच होणार आहे, उत्तम आहारचं आपला शरीर सदृढ करू शकतो आणि शरिर […]