बदलत राजकारण

खरंच राजकारण शब्द हा आपल्या राजकारणी लोकांनी वेगळ्या दिशेने नेऊन ठेवला आहे. आजच्या घडीला राजकारणाची घसरत चाललेली पातळी आणि त्याकडे बघण्याचा तरुनाईचा चा दृष्टीकोण बदल झाला आहे. प्रत्यकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र माझा कारण आज प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे राजकारणी लोक ही फक्त स्वार्थी, भ्रष्टाचारी आणि निवडणूक जवळ आली की सामन्यांना निवडणुकी पुरता आश्वासन देणारी आणि पैशाचे आमिष गोरगरिबांना दाखवून मत मिळवणारी अस चित्र निर्माण करुण ठेवले आहे. जे चालले आहे त्याला जबाबदर कोण हे ही आपण सर्वनी आत्म चिंतन करण्याची वेळ आली आहे. आज राजकआणि मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यामध्ये गुंतलेले आहेत त्याना सामान्य नागरिकांच्या समस्याशी काही एक घेणेदेणे उरलेले नाही , आज बेरोजगारी सारखी मोठी समस्या निर्माण झाली आहे त्यावर मात करण्यासाठी सरकार काही एक प्रयत्न करत नाही, आज आपल्या स्वार्थासाठी आज पक्षात तर उद्या त्या पक्षात उडया घेत ते धन्यता मानत आहेत त्यांना सामान्य माणसाच्या भविताव्याचे काही एक घेणं देणं उरलेले नाही, त्यांना फक्त स्वतःला सत्तेची पदे कशी मिळतील आणि त्या माध्यमातून आपली आणि परिवारातील लोकांची संपत्ती कशी वाढेल एवढच ध्येय असते.
आज महाराष्ट्र राज्य चे राजकारण बघितले तर जे पक्ष हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्ष अश्या गटात दोन गटात राहून गेली 40 वर्षे महाराष्ट्रत राज्य करीत आहेत आणि लोकांना भावनीक करून सत्ता मिळवत होते तेच पक्ष आज सर्व विचारसरणी बाजूला सोडून सत्तेसाठी एकत्र येत आहेत या सर्व गोष्टीचा विचार करण्याची गरज सामान्य माणसाला आहे कारण आज भावनेवर मतदान न करता विकासावर मतदान करण्याची वेळ आली आहे आणि जे विकास करणार नाही अश्या राजकारणी मंडळी ला घरी बसवले पाहिजे.
महाराष्ट्रला छत्रपती शिवाजी महाराजांना पासून फुले, शाहु,आंबेडकर या विचारसरणी लाभली आहे , शिवरायांच्या काळात गोरगरीब शेतकरी आनंदी होता कारण ते रयतेचे राज्य होते प्रत्येक माणसाच्या मनात हे राज्य आणि राजा आपला आहे स्वराज्य रक्षण या साठी आपले प्राणांचे आहुती देण्यात धन्यता मानत होते, राजा आणि प्रजा यामध्ये एक आपुलकी होती पण आज ही परिस्थिती बदलली आहे. सामान्य नागरिक आणि सत्ताधारी सरकार यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे. लोकांमध्ये सत्ताधारी बद्दल आस्था राहिली नाही त्याला जबाबदार सर्व राजकिय मंडळी आहे कारण एकीकडे अतिवृष्टी मुले शेतकऱ्याचे प्रंचड नुकसान झाले आहे हताश झाला तरी शेतकरी वर्गा पर्यंत कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत पोहचली नाही अशी भावना होती महान लोकांच्या परंपरा असलेल्या महाराष्ट्रत राजकारणाची पातळी खुप खालच्या पातळीवर येऊन पोहचली आहे. आज खरंच अशी वेळ आली आहे की या मंडळीनि या सर्वांचे विचार आत्मसात करण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अतिवृष्टी मुले सामान्य बळीराजा संकटात

भिवंडी तालुका सह वाडा तालुक्यातील शेतकरी वर्ग आज संकटात आहे कारण अतिवृष्टी आणि पालघर ,डहाणू या समुद्र किनाऱ्यावर आलेले चक्री वादळ या मुळे शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी वर्गाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. कारण वाडा-भिवंडी तालुक्यातील शेतकरी हा दरवर्षी भात शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून आपला उदर निर्वाह करत असतो पण […]