अतिवृष्टी मुले सामान्य बळीराजा संकटात


भिवंडी तालुका सह वाडा तालुक्यातील शेतकरी वर्ग आज संकटात आहे कारण अतिवृष्टी आणि पालघर ,डहाणू या समुद्र किनाऱ्यावर आलेले चक्री वादळ या मुळे शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी वर्गाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
कारण वाडा-भिवंडी तालुक्यातील शेतकरी हा दरवर्षी भात शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून आपला उदर निर्वाह करत असतो पण या अतिवृष्टी मुले हाता तोंडाशी आलेला घास गमवावा लागला आहे कारण कापणी साठी आलेलं धान्य शेतात शेतात कापून ठेवले असताना अचानक पडलेल्या पावसाने भातावर मोड येऊन भाताचे नुकसान झाले आहे, त्याचप्रमाणें शेतीसाठी लागणारे मजूर वेळवर न मिळाल्याने अनेक दिवसापासून शेतात ठेवलेला भातावर मोड येऊन तर खराब झाले आहे पण त्याचबरोबर शेतकरी जे भाताचे तण(पेंढा) असते ते विकून आपले मजुरीचा खर्च भागवत असतात पण तेही न खराब झाल्यामुळे आता शेतकरी वर्गाला शासना कडून नुकसानभरपाई आणि कर्ज माफीची गरज असताना सरकार या बाबतीत उदासीन दिसत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी हा दरवर्षी भात शेतीचे काम आटपून भाजी पाल्याचे उत्पादन घेत असतो पण अतिवृष्टी मुले त्यालाही विलंब झाल्याने बळी राजा चिंतेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भिवंडी-वाडा महामार्गावरील नदी नाक्यावरील विकासकामांचा शुभारंभ

भिवंडी: भिवंडी-वाडा महामार्गावरील नदी नाका येथील कामावरी नदीवरील पुल,रस्त्याचे बांधकाम आणि गटारीचे कामांचा शुभारंभ बुधवार दि.१३ नोव्हेंबर २०१९ रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भिवंडी ग्रामिण चे खासदार कपिल पाटील साहेब, भिवंडी पूर्वचे आमदार महेश चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. भिवंडी वाडा या महामार्ग वरून दिवस भर लाखो नागरिकांची ये […]