भिवंडी-वाडा महामार्गावरील नदी नाक्यावरील विकासकामांचा शुभारंभ

भिवंडी: भिवंडी-वाडा महामार्गावरील नदी नाका येथील कामावरी नदीवरील पुल,रस्त्याचे बांधकाम आणि गटारीचे कामांचा शुभारंभ बुधवार दि.१३ नोव्हेंबर २०१९ रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भिवंडी ग्रामिण चे खासदार कपिल पाटील साहेब, भिवंडी पूर्वचे आमदार महेश चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
भिवंडी वाडा या महामार्ग वरून दिवस भर लाखो नागरिकांची ये जा चालू असते परंतु नदी नाक्यावरील खराब रस्ता व पूलामुळे होणाऱ्या ट्राफिकचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता,परंतु या उदघाटन मुले नागरिकांना दिलासा मिळाला आहे व लवकरात लवकर रस्ताचे व पुलाचे काम पूर्ण करावे अशी नागरिकांची इच्छा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कुणबी सेनाचा आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्रात अतिवृष्टी मुले झालेल्या नुकसान भरपाई साठी व सरसकट कर्ज माफीसाठी कुणबी सेना आंदोलन करणार. पालघर व ठाणे या ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भात शेती करतात पण या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यासाठी शासना कडून त्वरित नुकसानभरपाई व कर्ज माफी व्हावी यासाठी कुणबी […]