अवकाळी पावसामुळे विट-भट्टी व्यवसाय लांबणीवर

भिवंडी:- यावर्षी दरवर्षीच्या सरासरी पावसाप्रमाणे अधिक काळ पाऊस पडला त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून शेतीला जोडधंदा असलेला विट-भट्टी व्यवसाय सुद्धा लांबणीवर गेला आहे.
ग्रामीण भागातील लोक शेतीला जोडधंदा म्हणून विट-भट्टी व्यवसाय करतात,परंतु परतीचा पाऊस उशीरापर्यंत पडल्यामुळे ग्रामीण भागातील विट-भट्टी व्यवसाय लांबणीवर गेला आहे.ठाणे-पालघर जिल्ह्यातील लाखो आदिवासी बांधव दरवर्षी या व्यवसायावर काम करुन आपला उदर-निर्वाह करतात परंतु आतापर्यत परतीच्या पावसाचे चिन्ह दिसत असल्यामुळे विट-भट्टी व्यवसाय दरवर्षी पेक्षा महिनाभर उशीरा सुरु होणार. याचाच परिणाम आदिवासी बांधवांच्या रोजगारावर झाला, यामुळे लाखो आदिवासी बांधवांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
त्याच प्रमाणे शेतीचे झालेले नुकसान आणि जोडधंदा म्हणून असलेला वीट भट्टी व्यवसायाला सुरवात करायची किंवा नाही या विवंचनेत वीट उत्पादक मालक आहेत कारण जर असाच अवकाळी पाऊस पडला तर तयार असलेला लांखो रुपयांचा कच्चा वीट माल मातीमोल होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गायिका गीता माळी यांचा शहापूरजवळ कार अपघातात दुर्दैवी मृत्यु

शहापूर: अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून परतत असताना नाशिक येथील प्रख्यात गायिका गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ १५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी अपघात झाला होता, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला . त्यांचे पती अॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे. मुंबई- नाशिक महामार्गावरील शहापूर शिवारात एकता हॉटेलसमोर कार आणि टँकरची धडक होऊन […]