गायिका गीता माळी यांचा शहापूरजवळ कार अपघातात दुर्दैवी मृत्यु

शहापूर: अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून परतत असताना नाशिक येथील प्रख्यात गायिका गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ १५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी अपघात झाला होता, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला . त्यांचे पती अॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे.
मुंबई- नाशिक महामार्गावरील शहापूर शिवारात एकता हॉटेलसमोर कार आणि टँकरची धडक होऊन हा अपघात झाला . गीता माळी यांच्यासोबत त्यांचे पती विजय माळीसुद्धा या अपघातात जखमी झाले असून शहापूर जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
गीता माळी या गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करीत होत्या. आज सकाळीच त्या मायदेशी परतल्या होत्या. एअरपोर्टहून नाशिकला परतत असताना शहापूर येथे अचानक समोर कुत्रा आडवा आला असता त्याला वाचविण्यासाठी गाडीच्या स्टेरिंगचे नियंत्रण सुटून गाडी हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस असलेल्या कंनटेंरला ला धडक दिली त्यावेळी गाडी स्वतः हा विजय माळी चालवत होते.गीता माळी यांचे गायनाचे देश विदेशात अनेक कार्यक्रम होत असतात,त्यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या चाहत्यांना व कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिक्षकी पेशाला काळिमा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा यशस्वी सापळा

पालघर: पालघर येथील दुर्वेस सावरे रस्त्यावरिल एम्बुर आश्रमशाळा च्या कुमार वामन पष्टे वय (५५ वर्षे)या मुख्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे च्या पालघर विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले . सप्टेंबर महिन्यात तक्रारदार याने अदिवासी विकास विभागाच्या एम्बुर आश्रम शाळेचे ध्वजस्तंभ व त्याच्यालगत पेवरब्लॉकचे कंत्राट घेतले होते व या पूर्ण झालेल्या कामाचा […]