शिक्षकी पेशाला काळिमा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा यशस्वी सापळा

पालघर: पालघर येथील दुर्वेस सावरे रस्त्यावरिल एम्बुर आश्रमशाळा च्या कुमार वामन पष्टे वय (५५ वर्षे)या मुख्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे च्या पालघर विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले .
सप्टेंबर महिन्यात तक्रारदार याने अदिवासी विकास विभागाच्या एम्बुर आश्रम शाळेचे ध्वजस्तंभ व त्याच्यालगत पेवरब्लॉकचे कंत्राट घेतले होते व या पूर्ण झालेल्या कामाचा पासष्ट हजार रुपये चा धनादेश देण्याकरीता दहा हजार रुपये लाचेची मागणी शाळेचे मुख्याध्यापक कुमार वामन पष्टे यांनी केली होती. सदर तक्रारदार ठेकेदार याने ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांना केली त्यावेळी या विभागाने सापळा रचून १३ नोव्हेंबर २०१९ रोजी दहा हजार रुपयेची लाचेची रक्कम कुमार पष्टे यांनी ही पंचासमक्ष स्वीकारली.यावेळी हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ ही घेण्यात आले आहेत.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी सर्व नागरीकांना आवाहन केले की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ
अँन्टी करप्शन ब्युरो ठाणे, कॅम्प पालघर दुरध्वनी क्रं.02525-297297, मोबा.क्रं.9552250404,टोल फ्रि क्रं. 1064 यांना संपर्क करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like