मनसे खडवली जनसंपर्क कार्यालयाचे अविनाश जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

खडवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचा विचार तळागाळातील पोहचविण्यासाठी व सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर आवाज उठविण्यासाठी एक हक्काची जागा हवी यासाठी खडवली विभागात मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन (दि.16 ) मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या ऊद्घाटन सोहळ्यात ठाणे जिल्हा संघटक मदन अण्णा पाटील, भिवंडी लोकसभा क्षेत्र जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन कल्याण उपतालुका अध्यश्य राजाभाऊ लोणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन ठाणे पालघर जिल्हा सचिव दिनेश बेलकरे आणि खडवली विभाग प्रमुख तेजस जाधव ह्यानी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आठ दिवसांच्या आत खडवली पंचक्रोशीतील विजसमस्यांचे होणार ऑडिट!

कल्याण: आज दिनांक २० ऑगस्ट रोजी, खडवली mseb कार्यालयातून नुकतेच कार्यभार सांभाळलेले कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी भेट घेतली. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या विजेच्या विविध समस्यांबाबत त्यांना अवगत करण्यात आले. त्यांनी सुध्दा कोणतेही उडवाउडवीचे उत्तर न देता, सकारात्मक प्रतिसाद देत, एका आठवड्याभरातच संपूर्ण लाईन चा सर्वे […]
Khadavali electricity issues