आठ दिवसांच्या आत खडवली पंचक्रोशीतील विजसमस्यांचे होणार ऑडिट!

Khadavali electricity issues

कल्याण: आज दिनांक २० ऑगस्ट रोजी, खडवली mseb कार्यालयातून नुकतेच कार्यभार सांभाळलेले कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी भेट घेतली.
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या विजेच्या विविध समस्यांबाबत त्यांना अवगत करण्यात आले. त्यांनी सुध्दा कोणतेही उडवाउडवीचे उत्तर न देता, सकारात्मक प्रतिसाद देत, एका आठवड्याभरातच संपूर्ण लाईन चा सर्वे करून डिटेल रिपोर्ट शेअर करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर, कामचुकार कर्मचाऱ्यांना वठनीवर आणण्यासाठी निर्देश दिले जातील आणि विजेच्या समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून, त्यात सर्व गावांतील जबाबदार नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे असे समाधान कारक उत्तर दिले आहे.
अलंकार म्हात्रेंची या आधिची कार्यप्रणाली लक्षात घेता, लवकरच खडवली पंचक्रोशीतील विजसमस्यांचे निराकरण होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

फलेगाव येथे सुरु होणार ११ वी, १२ वीचे वर्ग ? गोवेलीला जाणारा अतिख़र्च व अतिवेळ वाचनार!

कल्याण तालुक्यातील फळेगाव, नडगाव, दानबाव, रुंदे, उशीद, हाल, मढ, आंबीवली या गावांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणा – साठी गोवेली किंवा बिर्ला कॉलेज असे दूर अंतरावर जावे लागते. त्यामुळे येथे जाण्यासाठी लागणार वेळ, मुलां-मुलींची सुरक्षितता, पालक वर्गाला बसणारा आर्थिक फटका या सर्व बाबींचा विचार करून नुकतच फळेगाव येथे ११ वी आणि १२ […]