फलेगाव येथे सुरु होणार ११ वी, १२ वीचे वर्ग ? गोवेलीला जाणारा अतिख़र्च व अतिवेळ वाचनार!

कल्याण तालुक्यातील फळेगाव, नडगाव, दानबाव, रुंदे, उशीद, हाल, मढ, आंबीवली या गावांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणा – साठी गोवेली किंवा बिर्ला कॉलेज असे दूर अंतरावर जावे लागते. त्यामुळे येथे जाण्यासाठी लागणार वेळ, मुलां-मुलींची सुरक्षितता, पालक वर्गाला बसणारा आर्थिक फटका या सर्व बाबींचा विचार करून नुकतच फळेगाव येथे ११ वी आणि १२ चे आर्ट्स, कॉमर्स व सायन्सचे वर्ग सरू होण्याबाबत छत्रपती विद्यालय यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना वह्या देखील वाटप करण्यात आल्या. भविष्यात फलेगाव येथे ११ वी ,१२ वी चे वर्ग लवकरात लवकर सुरु व्हावेत अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दिनेश बेलकरे यांचा वाढदिवसा निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याचा युवकांना संदेश!

कल्याण/ प्रतिनिधी: नुकतच 29 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवहन सेलचे ठाणे- पालघर जिल्हा सचिव दिनेश बेलकरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत टिटवाळा येथील अनाथ आश्रमातील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळेस मुलांना नाश्ता व खाऊचे वाटप करण्यात आले, तसेच अपंग व्यक्तींना किराणा सामान वाटप करण्यात आले‌. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी […]