दिनेश बेलकरे यांचा वाढदिवसा निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याचा युवकांना संदेश!

Dinesh Belkare Birthday

कल्याण/ प्रतिनिधी: नुकतच 29 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवहन सेलचे ठाणे- पालघर जिल्हा सचिव दिनेश बेलकरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत टिटवाळा येथील अनाथ आश्रमातील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळेस मुलांना नाश्ता व खाऊचे वाटप करण्यात आले, तसेच अपंग व्यक्तींना किराणा सामान वाटप करण्यात आले‌. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आपल्या सर्व मित्र परिवार, नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना यापुढील त्यांचे वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण तालुक्यातील मोस व नवगाव येथील गरीब- गरजू महिलांना रेशन किट वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

काकडपाडा-पलसोली येथे कोविड लसीकरण चालू होणार! मनसेच्या मागणीला आले यश!

कल्याण प्रतिनिधी: सुमारे साडेआठ हजार लोकवस्ती असलेल्या काकडपाडा, पलसोली, वेहळे, गेरसे आणि कोसला या गावांसाठी कोणत्याही प्रकारची शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध नाही आहे. या गावांसाठी शासनातर्फे पलसोली येथे एक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आले होते, पण सध्या ते बंद आहे. तसेच उपकेंद्रा अभावी या गावांमधील नागरिक लसीकरणापासून सुद्धा वंचित आहेत. कोविड […]