काकडपाडा-पलसोली येथे कोविड लसीकरण चालू होणार! मनसेच्या मागणीला आले यश!

Kakadpada kalyan mns

कल्याण प्रतिनिधी: सुमारे साडेआठ हजार लोकवस्ती असलेल्या काकडपाडा, पलसोली, वेहळे, गेरसे आणि कोसला या गावांसाठी कोणत्याही प्रकारची शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध नाही आहे. या गावांसाठी शासनातर्फे पलसोली येथे एक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आले होते, पण सध्या ते बंद आहे. तसेच उपकेंद्रा अभावी या गावांमधील नागरिक लसीकरणापासून सुद्धा वंचित आहेत.
कोविड लसीकरणाची गरज लक्षात घेता आणि आरोग्य सुविधांचा अभाव लक्षात घेता, शासनाने त्वरित पलसोली येथील उपकेंद्र पुर्ण क्षमतेने चालू करून त्यात इतर आरोग्यसुविधां सोबतच त्वरित कोविड लसीकरण चालू करावे, अशा मागणीचे निवेदन दिनेश बेलकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष दत्तात्रेय चौधरी आणि सामाजिक कार्यकर्ते किरण चौधरी यांच्यातर्फे कल्याण तालुका आरोग्य अधिकार्यांकडे सोपविण्यात आले आहे. ह्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी विषाल बारनिस, दिलिप जाधव, निवृत्ती ढोले, दिनेश जाधव, अविनाश देसले, बाळा चौधरी, पवन भोईर, विजय भोईर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आठवड्याभरातच ६० वर्षांवरील नागरिकांसाठी लसिकरण सुरू करण्यात येईल आणि लवकरच १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात येईल अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
त्यामुळे लवकरच पलसोली आरोग्य उपकेंद्र पूर्ण क्षमतेने चालू होऊन, कोविड लसीकरण चालू होईल अशी अशा गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *