काकडपाडा-पलसोली येथे कोविड लसीकरण चालू होणार! मनसेच्या मागणीला आले यश!

कल्याण प्रतिनिधी: सुमारे साडेआठ हजार लोकवस्ती असलेल्या काकडपाडा, पलसोली, वेहळे, गेरसे आणि कोसला या गावांसाठी कोणत्याही प्रकारची शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध नाही आहे. या गावांसाठी शासनातर्फे पलसोली येथे एक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आले होते, पण सध्या ते बंद आहे. तसेच उपकेंद्रा अभावी या गावांमधील नागरिक लसीकरणापासून सुद्धा वंचित आहेत. कोविड […]

दिनेश बेलकरे यांचा वाढदिवसा निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याचा युवकांना संदेश!

कल्याण/ प्रतिनिधी: नुकतच 29 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवहन सेलचे ठाणे- पालघर जिल्हा सचिव दिनेश बेलकरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत टिटवाळा येथील अनाथ आश्रमातील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळेस मुलांना नाश्ता व खाऊचे वाटप करण्यात आले, तसेच अपंग व्यक्तींना किराणा सामान वाटप करण्यात आले‌. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी […]

फलेगाव येथे सुरु होणार ११ वी, १२ वीचे वर्ग ? गोवेलीला जाणारा अतिख़र्च व अतिवेळ वाचनार!

कल्याण तालुक्यातील फळेगाव, नडगाव, दानबाव, रुंदे, उशीद, हाल, मढ, आंबीवली या गावांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणा – साठी गोवेली किंवा बिर्ला कॉलेज असे दूर अंतरावर जावे लागते. त्यामुळे येथे जाण्यासाठी लागणार वेळ, मुलां-मुलींची सुरक्षितता, पालक वर्गाला बसणारा आर्थिक फटका या सर्व बाबींचा विचार करून नुकतच फळेगाव येथे ११ वी आणि १२ […]

आठ दिवसांच्या आत खडवली पंचक्रोशीतील विजसमस्यांचे होणार ऑडिट!

कल्याण: आज दिनांक २० ऑगस्ट रोजी, खडवली mseb कार्यालयातून नुकतेच कार्यभार सांभाळलेले कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी भेट घेतली. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या विजेच्या विविध समस्यांबाबत त्यांना अवगत करण्यात आले. त्यांनी सुध्दा कोणतेही उडवाउडवीचे उत्तर न देता, सकारात्मक प्रतिसाद देत, एका आठवड्याभरातच संपूर्ण लाईन चा सर्वे […]

मनसे खडवली जनसंपर्क कार्यालयाचे अविनाश जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

खडवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचा विचार तळागाळातील पोहचविण्यासाठी व सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर आवाज उठविण्यासाठी एक हक्काची जागा हवी यासाठी खडवली विभागात मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन (दि.16 ) मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या ऊद्घाटन सोहळ्यात ठाणे जिल्हा संघटक मदन अण्णा […]

शिक्षकी पेशाला काळिमा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा यशस्वी सापळा

पालघर: पालघर येथील दुर्वेस सावरे रस्त्यावरिल एम्बुर आश्रमशाळा च्या कुमार वामन पष्टे वय (५५ वर्षे)या मुख्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे च्या पालघर विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले . सप्टेंबर महिन्यात तक्रारदार याने अदिवासी विकास विभागाच्या एम्बुर आश्रम शाळेचे ध्वजस्तंभ व त्याच्यालगत पेवरब्लॉकचे कंत्राट घेतले होते व या पूर्ण झालेल्या कामाचा […]

गायिका गीता माळी यांचा शहापूरजवळ कार अपघातात दुर्दैवी मृत्यु

शहापूर: अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून परतत असताना नाशिक येथील प्रख्यात गायिका गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ १५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी अपघात झाला होता, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला . त्यांचे पती अॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे. मुंबई- नाशिक महामार्गावरील शहापूर शिवारात एकता हॉटेलसमोर कार आणि टँकरची धडक होऊन […]

अवकाळी पावसामुळे विट-भट्टी व्यवसाय लांबणीवर

भिवंडी:- यावर्षी दरवर्षीच्या सरासरी पावसाप्रमाणे अधिक काळ पाऊस पडला त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून शेतीला जोडधंदा असलेला विट-भट्टी व्यवसाय सुद्धा लांबणीवर गेला आहे. ग्रामीण भागातील लोक शेतीला जोडधंदा म्हणून विट-भट्टी व्यवसाय करतात,परंतु परतीचा पाऊस उशीरापर्यंत पडल्यामुळे ग्रामीण भागातील विट-भट्टी व्यवसाय लांबणीवर गेला आहे.ठाणे-पालघर जिल्ह्यातील लाखो आदिवासी बांधव दरवर्षी या व्यवसायावर काम […]

महिला आर्थिक विकास महामंडळाचे शेतकरी वर्गासाठी एक पाऊल पुढे

ठाणे: ठाणे जिल्हा परिषद मध्ये दि.१३ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बद्दल शेतकऱ्यांना लवकरात लवकर काय मदत करता येईल यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ माध्यमातून चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. ठाणे जिल्हा परिषदेत झालेल्या या बैठकीत राज्य कृषी विकास विभाग, ठाणे जिल्हा कृषी विभाग आणि तालूका कृषी अधिकारी […]

कुणबी सेनाचा आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्रात अतिवृष्टी मुले झालेल्या नुकसान भरपाई साठी व सरसकट कर्ज माफीसाठी कुणबी सेना आंदोलन करणार. पालघर व ठाणे या ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भात शेती करतात पण या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यासाठी शासना कडून त्वरित नुकसानभरपाई व कर्ज माफी व्हावी यासाठी कुणबी […]